दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार :- डॉ. हरीशकुमार गाडेकर कळकेकर एम. डी.स्त्रीरोग विशेषतज्ञ अधिक्षक शासकीय ग्रामीण रूग्णालय पुर्णा जी. परभणी हे दिनांक ३१/०३/२०२३ रोज शुक्रवार रोजी सेवानिवृत्त झाले असून त्याचे मुळ गाव कळका ता. कंधार जि. नांदेड आहे. त्यांचे आईवडील शेतमजूर असून अत्यंत निर्णायक आर्थिक स्थितीत त्यांनी आंबुलगा येथील माणिक प्रभू विद्यालयात शिक्षण पूर्ण केले तसेच यशवंत महाविद्यालयात बारावी उत्तीर्ण होऊन.शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात निवड झाली. एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे एमडी स्त्रीरोग शास्त्र पुर्ण केले. त्यांची वर्ग -१ स्केल आर एच हिमायतनगर प्रभारी म्हणून पदोन्नति झाली आहे.त्यानंतर त्याच पदासाठी आर एच पुर्णा येथे बदली झाली आहे. त्यांचे कौटुंबिक जीवन अतिशय आदर्श आहे. दोन्ही मुलांनी इंजिनिअरींग पुर्ण केले आहे.मुलगा आय आय टी इंजिनिअर व आय आय एम कलकत्ता येथे पुर्ण केले आहे.दिनांक ३१/०३/२०२३ रोजी ते कर्तव्यातून सेवानिवृत्त झाले आहेत.कळका येथील नागरिक व आप्तेष्ट, मित्रमंडळी यांनी त्यांना आनंदी निरोगी सेवानिवृत्त आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.