
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा.दवणे
मंठा तालुक्यातील हेलस ईश्वर नगर येथील दत्ता विठ्ठल पवार याला कौटुंबिक कारणावरून ,लाठ्या काठ्या लोखंडी पाईपाने जबर मारहाण केली एवढेच नव्हे तर जीवे मारण्याची धमकी दिली अशा आशयाची फिर्याद कमलबाई भ्र प्रकाश राठोड यांनी दिली आहे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हेलस ईश्वर नगर येथील 1 ) दत्ता विठ्ठल पवार 2) विजय विठ्ठल पवार 3) कृष्णा विठ्ठल पवार 4) अमोल संजय पवार 5) समाधान विजय पवार 6) राहुल संजय पवार 7) शांताबाई विठ्ठल पवार 8)संगीता भ्र संजय पवार 9) लताबाई भ्र विजय पवार 10) रुखाबाई भ्र दत्ता पवार 11) नंदाबाई भ्र कृष्णा पवार 12) ज्योतिबाई भ्र अमोल पवार आणि13) विठ्ठल गोपीचंद पवार (सर्व रा हेलस ईश्वर नगर) या सर्व मंडळींनी दि 25-3-23 रोजी दुपारी 12 चे दरम्यान बेकायदेशीर मंडळी जमवून माझ्या घरी आले व फिर्यादी (कमल )च्या पतीस व मुलास ,माझ्या भावजयीस काढून का नेले असे विचारले असता त्याच्या उत्तराने समाधान झाले नाही व फिर्यादी मंडलीने शिव्या देऊन वाद सुरू केला त्या दोघांना बोलण्याची संधी न देता सर्वांनी लाथा बुक्क्या लाठ्या काठ्याने मारहाण सुरू केली लोखंडी गज पाईपाने डोक्यात मारहाण करून रक्त बंबाळ व जबर जखमी केले तेंव्हा त्यांना आम्ही जालना येथे उपसचारार्थ दवाखान्यात प्रविष्ठ केले
सदर महिलेने दि 29 -3-23 रोजी दिलेल्या या फिर्यादीवरून वर निर्दिष्ठ 13 आरोपीवर कलम 143,147 ,148 ,149 ,324 , 325 , 326 , 336 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पो नि संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार स पो नि चव्हाण करणार आहेत..