
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
शहरातील दत्ता नगर भागातील शहीद भगतसिंग प्राथमिक विद्यामदिर येथील इयत्ता तिसरीच्या अकरा विद्यार्थ्यांनी मंथन परीक्षेत यश मिळविले आहे.सन २०२२-२३ दरम्यान मंथन प्रज्ञा शोध परीक्षा नुकत्याच घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेत शहीद भगतसिंग प्राथमिक शाळेतून अकरा विद्यार्थी विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी सर्वच विद्यार्थ्यांनी घवघवित यश प्राप्त केले आहे.
नील प्रदीप पांचाळ, प्रणव नितीन शिंदे, शिवम अविनाश डोरले, शिवम सतीश चिंचकर, सैफ आलम वसीम शेख, पृथ्वीराज सत्यन शेळके, श्रावनी श्रीराम कदम , शुभ्रा रमेश फुंने, पूर्वा नारायण चिंचकर, प्रार्थना प्रथीतयश गायकवाड, अमृता श्रीकांत गोंड या विद्यार्थिनी चांगले गुण मिळवून यश संपादन केले आहे.
अशा प्रकारच्या विविध स्पर्धा परीक्षा आमाच्या शाळेत राबवण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्याना भावी आयुष्यात स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यास सोपे जाईल असे मत विद्यार्थ्याच्या सत्कार प्रसंगी मुख्याध्यापक हरिश्चंद्र शेळके यांनी मत व्यक्त केले.
मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका श्रीमती संगीता धुमाळ यांचाही सत्कार शाळेच्या पारीवेक्षिका संगीता करपे यांनी केला.