
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड:तालुक्यातील धारासुर येथील प्राचीन ऐतिहासिक गुप्तेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठीच्या प्रस्तावाचे भाग एक व भाग दोन असे दोन गट पुरातत्त्व विभाग नांदेड यांच्याकडून करण्यात आलेले आहेत.
भाग एकचा प्रस्ताव हा 14 कोटी 79 लाख रुपयाचा असून या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता व वित्तीय मान्यता सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशाने लवकरच मिळणार आहे.आणि पुरातत्त्व विभाग महाराष्ट्र शासन नांदेड विभागाकडून गुप्तेश्वर मंदिर जीर्णोद्धाराची कामे तातडीने सुरू होणार असून सदरील कामाचा कालावधी हा 36 महिन्याचा असून भाग दोन हा प्रस्ताव पहिल्या प्रस्तावाचे चालू असलेले काम 24 महिने काम पूर्ण झाल्या नंतर लगेच भाग दोन प्रस्ताव हा मंजूर होऊन मंदिराचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती गुप्तेश्वर बचाव समितीचे सभासद निवृत्ती कदम यांनी दैनिक चालु वार्ता शी बोलताना दिली.