
दै.चालु वार्ता
विष्णुपुरी प्रतिनिधि
बालाजीराव गायकवाड
प्रतापराव पाटील माध्यमिक विद्यालय हरसद पाटीयेथे 26.11. 2021 रोजी भारतीय राज्यघटनेचे, संविधान, उद्देश पत्रिका सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद यांनी सामूहिक वाचन केले आणि भारतीय संविधान दिन साजरा केला यावेळी संविधानाचे महत्त्व मु.अ. सूर्यवंशी सर यांनी सांगितले.या कार्यक्रमाला उपस्थित सौ गायकवाड मॅडम, मारोती कदम सर, बालाजी गायकवाड पाटील सर, गटलेवार सर , गजानन भुरे, रामेश्वर पाटील किरवले, सुदर्शन पाटील व सर्व कर्मचारी विद्यार्थी, विद्यार्थिनी या कार्यक्रमात सहभागी झाले व सर्वांनी संविधानाचे मौखिक सामुहिक वाचन केले.विद्यार्थी यांना स्वातंत्र्य ,समता, बंधुता यांचे महत्त्व पटवून देऊन आपण आतापर्यंत तसे जीवन जगले व इथून पुढे लोकशाहीच्या मार्गाने अतिशय सक्षमपणे जीवन जगावे यासाठी मोलीक असे मार्गदर्शन सर्व शिक्षक वृंद यांनी केले.जीवन जगत असताना संविधानाचा आधार घेऊन जगावे असा मौलिक संदेश आजच्या या संविधान दिनी सर्व विद्यार्थ्यांना दिला व संविधान दिन उत्साहात साजरा केला .