
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे/इंदापूर:निमगाव केतकी येथील बाबासाहेब भोंग यांची बहुजन मुक्ती पार्टीच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सावता परिषदेच्या वतीने सावता परिषदेचे प्रदेश मुख्य संघटक संतोष राजगुरू व इंदापूर तालुका पंचायत समितीचे मा. सभापती दत्तात्रय भाऊ शेंडे यांनी सत्कार केला.
बाबासाहेब भोंग हे गेली तीस वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय असतात. छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर विचार तळागाळामध्ये, समाजामध्ये रुजवण्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. ते चळवळीत गेल्या अनेक वर्षापासून सक्रियपणे कार्यरत आहेत. पाठीमागे समता परिषदेचे तालुका अध्यक्ष म्हणूनही त्यांनी चांगले कार्य केलेले आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून बहुजन मुक्ती पार्टी इंदापूर तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. या चांगल्या कार्याची दखल घेऊन बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲड.राहूलजी मखरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब भोंग यांची बहुजन मुक्ती पार्टी च्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी बहुजन मुक्ती पार्टी संघटनेने निवड केलेली आहे. या अगोदरही बाबासाहेब भोंग निमगाव केतकी ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत सदस्य गावचे उपसरपंच म्हणूनही त्यांनी चांगले कार्य निमगाव केतकी पंचक्रोशी त गावात केलेल आहे.सर्व महापुरुषांच्या जयंती साजरा करणे, पुण्यतिथी साजरा करणे, व्याख्यान आयोजित करणे, समाजामध्ये जनजागृती करणे यासाठी बाबासाहेब भोंग नेहमी सक्रिय असतात.
यावेळी उपस्थित गजराज परिवाराचे अध्यक्ष संदीप भोंग, राष्ट्रवादीचे नेते सुवर्णयुग पतसंस्थेचे संचालक बापूसाहेब घाडगे, विकास सोसायटीचे संचालक विजय महाजन, मा चेअरमन मधुकर भोंग, युवक नेते चंद्रकांत शेंडे, दादासाहेब भिसे, श्री गणेश पतसंस्थेचे संचालक कांतीलाल शेंडे, विकास सोसायटी संचालक महादेव शेंडे, विठ्ठल शेंडे, लक्ष्मण फरांदे, शशिकांत गोटे, देवा भोंग, जगन्नाथ शिंदे, संजय राजगुरू, अनिल राजगुरू उपस्थित होते