
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:श्री रामचंद्र की जय जय श्रीराम अशा घोषणा देत श्रीराम चंद्र कि जय असे गजर करत शहरामध्ये श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. प्रभू श्री रामाची व श्री प्रभू हनुमानाची पूर्णाकृती पुतळ्याची शोभायात्रा काढण्यात आली.
या शोभायात्रेची सुरुवात श्री हनुमान मंदिर कापड बाजार देगलूर येथून आरती करून करण्यात आली ही शोभायात्रा देशपांडे गल्ली तोटावार गल्ली,भटगल्ली शाळा शरदचंद्र पवार कॉम्प्लेक्स पासून लोहीया मैदान आणि या शोभा यात्रेचा समारोप श्री हनुमान मंदिर कापड बाजार येथे करण्यात आला. या शोभा यात्रेचे मुख्य आकर्षण प्रभू श्रीरामचंद्राची व प्रभू हनुमानाची भव्य मूर्ती व श्री संत गाडगेबाबा पंचपुरा विद्यालय मालेगाव मक्ता या शाळेतील मुलींचे लेझीम पथक व तसेच बालगोपाळाचे राम दरबार हे ठरले या शोभयात्रेत हजारो राम भक्तांनी सहभाग नोंदवीला. यात महिलांसहित बालगोपाल यांनी सुद्धा भाग घेतला या शोभा यात्रेत अनेकांनी भगवे कपडे भगव्या टोपी परिधान करून देगलूर शहर भगवामय करून टाकला. या शोभायात्रेचे आयोजन श्री राम जन्मोत्सव समिती श्री हनुमान मंदिर कापड बाजार देगलूर यांनी केली. ही शोभायात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समितीचे किशोर बालराज तोटावार. ब्रिजेश गडमवार. रवींद्र मोरे. गजानन बोगुलवार. राजू दरपलवार. रवी के उल्लेवार. अरुण आऊलवार. व्यंकटेश उरलागोडावार. साई आडीशेरलावार. आदिनी मेहनत घेतली.