
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- गुढीपाडवा हा आनंदाचा शिधा व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त औचित्य साधून राज्यातील व मौ.गंगाहिप्परगा येथील नागरिकांना शासनाकडून गुढीपाडवा आनंदाचा शिधावाटप केला गेला आहे ज्यामध्ये पात्र रेशनकार्ड धारकांना 100 रुपयात खालील प्रमाणे वस्तूंचा वाटप करण्यात आले दि.30/03/2023 रोजी प्रत्येकी एक-एक किलो चणाडाळ, रवा आणि साखर तसेच एक लिटर पामतेल आदी चार वस्तूंचा समावेश आहे. गोरगरिबांचा गुढीपाडवा व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त औचित्य साधून गोड व्हावी, या उद्देशाने शासनाने या चारही वस्तूंचे किट केवळ शंभर रुपयांमध्ये देण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली. परंतु, गुढीपाडवा अगदी जवळ आली तरी ‘आनंदाचा शिधा’ लाभार्थ्यांना वाटप करण्यास सुरुवात झाली अहमदपूर तालुक्यातील मौ.गंगाहिप्परगा येथील लाभार्थी 446 पात्र कुटुंबे असून आनंदाचा शिधा वाटप झाला आहे त्यामध्ये साखर, चणाडाळ, पामतेल, रवा यांचे रेशन दुकानांमध्ये वाटप झाले आहे तरी चारही वस्तू एकत्रित आल्याशिवाय या वस्तूंचे किट वाटप करणे शक्य झाले आहे मध्ये आनंदाचा शिधा कधी? या मथळ्याखाली नुकतेच वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्तानंतर शासकीय पातळीवर वेगाने हालचाली झाल्या. अखेर गुरुवारगपासून रेशनकार्डधारकांना आनंदाचा शिधा वाटपाला सुरुवात झाली.
आदी भागातील रेशन दुकानातून लाभार्थ्यांना चारही वस्तूंचे किट वाटप करण्यात आले असल्याची माहिती रेशनिंगच्या अधिकाऱ्यांनी दिली. मौ.गंगाहिप्परगा येथील रेशन दुकानदार कैलास कदम यांच्या हस्ते तसेच रेशनिंग अधिकाऱ्यांच्या व गावातील रेशनकार्ड धारकांच्या उपस्थितीमध्ये या मध्ये कृष्णा वाघमारे, उमाकांत व्हुनगुंडे,रावण पिटले, सुर्यकांत कदम या सर्वांना आनंदाचा शिधा वाटपास सुरुवात करण्यात आली. परंतु, ‘फ’ परिमंडळामध्ये अंत्योदय आणि प्राधान्य रेशनकार्ड धारकांना त्यामुळे पूर्णपणे शिधा आलेला आहे मोठ्या प्रमाणावर रेशनकार्ड धारक आनंदाचा शिधापासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाहीत असी माहिती गंगाहिप्परगा येथील रेशन दुकानदार यांनी असी माहिती दिली आहे