
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा तालुक्यातील पांगरी येथील वारकरी संप्रदायायाचे पाईक ज्यांनी पंढरपूरची विठ्ठलाची नित्यनेमाने वारी केली असे पांगरी येथील वारकरी कै ज्ञानोबा ईश्वरराव पाटील बुद्रुक यांच्या व्दितीय पुण्यस्मरणानिमित्त मराठवाडा भुषण किर्तनकेसरी श्री ह भ प अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या एकदिवसीय किर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले.
भव्य दिव्य एकदिवसीय किर्तन सोहळा पांगरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सकाळी ११ ते १ यावेळेत होणार असुन या एकदिवसीय भव्य दिव्य किर्तन सोहळ्यास पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आव्हान सत्कर्म प्रतिष्ठानचे अध्यक्ष ञ्यंबक पाटील बुद्रुक यांच्यासह गोपाळ पा बुद्रुक , रामेश्वर पा बुद्रुक पाटील परीवार यांनी केले आहे.