
दैनिक चालू वार्ता
नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी
समर्थ दादराव लोखंडे
या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. परशुराम येसलवाड सर हे होते तर प्रमुख उपस्थिती कौठा शाखेचे प्रमुख प्रा. सय्यद जमिल सर उपस्थित होते.संविधानाचे वाचन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. गोविंद मोरे सर यांनी केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्व सांगितले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक क्षेत्रात कॉलेजचे व स्वतःचे नाव लौकिक करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.रेडिओवरून सोशल मिडियाचे फायदे/तोटे या विषयावर कार्यक्रम प्रसारित केल्या बद्दल 12वी sci चा स्वागत गोडबोले या विद्यार्थीचे व नाट्य क्षेत्रात पदार्पण करून नाटकात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल 11 वी sci ची विद्यार्थ्यांनी कु. दीक्षा दत्तात्रय कुरुडे हिचा विशेष सत्कार करून तिला पुढील कार्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यकर्मासाठी फलक लेखन प्रा योगेश दिग्रसकर सर , प्रा. शिवशंकर देशमुख व प्रा. दीपक श्रीवास्तव सर यांचे सहकार्य लाभले प्रा. शेख उमरसर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संगीता स्वामी मॅडमने केले तर आभार प्रदर्शन प्रा. ज्ञानेश्वर लुंगारे सर यांनी केले.या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमानंतर मतदान जनजागृती निमित्ताने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. सर्व प्राध्यापकांनी नोडल अधिकारी प्रा. गोविंद मोरे सरांना या कार्यासाठी सहकार्य केले. सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडला.