
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- धारणी तालुक्यात आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली.तेथील सर्व सेवा सुरळीत करून नुकसानीबाबत पंचनामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत.
धारणीत अवकाळी पावसाने झाडे कोसळल्याने काही रस्ते बंद झाले होते.काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला.ही स्थिती लक्षात घेऊन रस्ते,वीज आदी सेवा तत्काळ सुरू करण्याचे निर्देश क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले.त्यानुसार झाडे हटवून रस्ते मोकळे करण्यात आले आहेत.वीज पुरवठा पूर्ववत करण्याबाबत युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले.
अवकाळी पावसाने कुठलीही जिवितहानी झाली नाही. काही ठिकाणी घरांची पडझड झाली.या नुकसानीचे पंचनामे ४८ तासांत सादर करण्यात येतील,असा अहवाल तहसीलदारांनी दिला आहे.