
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
बीड- -माजी सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शनसह विविध मागण्यांसाठी, त्रिदल सैनिक सेवा संघातर्फे बीड येथे पायी रॅलीचे सोमवारी (दि. ३) आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष अंकुश खोटे यांनी दिली. रॅलीमध्ये माजी सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही अंकुश खोटे यांनी केले.
भूतपूर्व सैनिकांवर वन रैंक वन पेन्शनमध्ये झालेल्या अन्यायाविरुद्ध जंतरमंतर, नवी दिल्ली येथे २० फेब्रुवारी २०२३ पासून सुरू असलेल्या आंदोलनास त्रिदल माजी सैनिक सेवा संघाने पाठिंबा दिला आहे. ५० हून अधिक दिवसांपासून सुरु असलेल्या न्याय्य मागण्यांसाठी राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील माजी सैनिक संघटनांच्या जिल्हाध्यक्षांनीही पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात सुमारे ४ हजार २०० निवृत्त वेतनधारक माजी सैनिक असून त्रिदल माजी सैनिक सेवा संघातर्फे बीड येथे सोमवारी (दि. ३) छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वन रैंक, वन पेन्शनसह विविध मागण्यांसाठी पायी रॅली काढण्यात येणार आहे. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार असून सर्व माजी सैनिकांनी या रॅलीतउत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अंकुश खोटे, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ भगत उपाध्यक्ष जमीर पठाण, सचिव हनुमान झगडे, सहसचिव, बबन दहिफळे, कोषाध्यक्ष गोरख काळे व ज्ञानेश्वर भोसले, सतिश नरोडे, अशोक खाडे या सदस्यांनी केले आहे.