दैनिक चालु वार्ता
जालना प्रतिनिधी
नितीन भदर्गे
परतूर तालुक्यातील परतुर शहर व वाटूर भागामध्ये अवैध दारूधंदे अवैध धंद्याने जोर धरला असून अवैध दारूधंदे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई दुर्मिळ झाली आहे अवैध दारू धंदेवाले मोकाट झाले असल्याचे चित्र सध्या स्थितीत दिसून येत आहे स्थानिक गुन्हे शाखे चे याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे तर स्थानिक पोलिस प्रशासन वेळप्रसंगी कारवाईचा बडगा उगारत कारवाईचा फार्स करत आहेत परतूर तालुक्यातील परिसरात गावात अवैध दारू चोरून विकली जात आहे त्यावर संबंधित विभागाचा जरब कमी झाल्याचे जाणवते आहे पोलिसांनी केलेल्या किरकोळ कारवाईने परिसरातील गावात अवैध दारू विक्री सुरू असल्याचे उघड होत आहे तर संबंधित विभाग अवैध धंदे विरोधात कारवाई करणार का ? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे अनेक ठिकाणी उघड्यावर धंदे सुरू असून देशी दारूच्या बाटल्या चुचाकीसह चारचाकी वाहनातून पोहोच केल्या जातात अवैध दारूचा गुत्ता बेफामपणे सुरू असून याचा नाहक त्रास नागरिकांसह परिसरातील रहिवाशांना होत आहे आर्थिक गुन्हे शाखेच्या आर्थिक हितसंबंधा मुळे या दारूविक्री कडे डोळेझाक केल्याची चर्चा येथील परिसरात सुरू आहे
आशीर्वाद कोणाचे ?
लोक डाऊन च्या काळात बंद असणाऱ्या अवैध दारूआडे अचानक तेजीत सुरू झाले असून ते नेमके कोणाच्या आशीर्वादाने सुरू झाले आहेत याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचे अशा अवैध दारू विक्रेत्यांवाल्यावर वर वरदहस्त असून, वर्षातून केवळ एक ते दोन कारवाया करून पाठीवर कौतुकाची थाप मारुन घेत असल्याची चर्चा नागरिकांतून बोलले जात आहेत पोलिस यंत्रणा परिसरातील दारू धंद्यावर दिखाऊपणा करीत कारवाई केल्याचा आव आणत आहेत स्थानिक गुन्हे शाखेने पूर्ण लोक डॉन दरम्यान पाठच फिरवली असल्याचे दिसून येत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे केवळ महिन्यातून ठराविक दिवशी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी दिसत असतात त्यात मात्र कारवाई चा पत्ता नसल्याचे साप दिसते आहे त्यांनी लॉक डाऊन दरम्यान किती कारवाई केल्या हा एक संशोधनाचा विषय ठरावा.