दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनीधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा): भाजपचे आष्टी पं.स.माजी उपसभापती गोविंदराव खंडाळे काँग्रेसच्या वाटेवर या दै.चालू वार्ताच्या वृत्ताने तालुका भाजपच्या गोटात खळबळ उडाली आणि भाजपने दुर्लक्षित केलेल्या गोविंदरावांची मनधरणी करण्यासाठी एक बैठक बोलावली असल्याचे खात्रीलायक वृत्त दै.चालू वार्ताच्या हाती लागले आहे खंडाळे दाम्पत्याची ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाराजी ओढवणे पक्षाला हानी पोहोचविणारे असून याचा फटका पक्षाला परवडणार नाही असे आष्टी तालुका भाजपच्या शाखेने हेरून एक रणनीती ठरवत माजी उपसभापती गोविंदराव खंडाळे व ग्रा.पं.तारासांवगा सरपंच शितलताई खंडाळे यांची अंतर्गत नाराजी दूर करण्याचा फॉर्म्युला ठरला असल्याचे समजते एकंदरीत खंडाळे दाम्पत्याची दुखावलेली मने व स्थानिक कार्यकर्त्याकडून झालेली गोची सोडवण्यात भाजपा तालुका शाखेला कितपत यश येते याकडे सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत खंडाळे दाम्पत्यांना स्वतंत्रपणे जनसेवा व विकास कामे करण्यासाठी अंतर्गत गटाचे दवाब तंत्र नकोसे झाले आहे पक्षाव्यतिरिक्त कोणत्याही नेत्या कार्यकर्त्याची भेट घेण्याचे स्वातंत्र्य एक राजकीय दाम्पत्य म्हणून संयुक्तिक आहे मात्र त्यात राजकारण आणून नेहमीच टार्गेट केले जाते आहे आमच्याच मताने सरपंचाने निर्णय घ्यावेत हा गटाच्या कार्यकर्त्याचा अट्टाहास कशासाठी ?असा आरोप भाजपाचे माजी पं.स. उपसभापती गोविंदराव खंडाळे यांनी केला आहे निमित्त होते काँग्रेस पक्ष व मित्रपरिवाराने आयोजित केलेल्या सर्वधर्मीय सामूहिक सोहळ्यात उपस्थित होण्याचे, विवाह सोहळ्याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्त्या सोबत झालेली चर्चा व छायाचित्र दै. चालू वार्ता ने टिपली होती त्यावर खुलासा देताना खंडाळे यांनी मी भाजपचा कार्यकर्ता असून कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिला नाही मित्राच्या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने सामूहिक विवाह सोहळ्यात उपस्थित होतो दरम्यान अनेक राजकीय नेते व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी झाल्या छायाचित्र काढले त्यामुळे मी इतर पक्षात प्रवेश केला असे होत नाही असे म्हटले आहे खंडाळे दाम्पत्याची नाराजी दूर करण्यात भाजपची तालुका शाखा कितपत यशस्वी होते याकडे तालुक्यातील राजकीय धुरीनांच्या नजरा लागल्या आहे