
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी-अनिल पाटणकर
पुणे – येथील धनकवडी भागातील समाजकार्यात आपल्या कार्यकर्तुत्वाने वेगळा ठसा उमटवनारे आणि सर्वसामान्य जनतेच्या छोट्या मोठ्या अडीअडचणी निवारणासाठी त्यांना कायम खंबीर साथ देणारे सामाजिक कार्यकर्ते समीर धनकवडे यांच्या वाढदिवसानिमित्त ओम ब्लड बॅंक यांचे सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात एकुण १९० पिशव्या रक्ताचे संकलन करण्यात आले.
या रक्तदान शिबीराचे उद्घाटन खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिमराव तापकीर व उद्योजक अतुल धनकवडे यांचे शुभहस्ते करण्यात आले या शिबीराला स्थानिक नागरिक आणि मित्रपरिवाराचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याने तब्बल १९० पिशव्या रक्ताचे संकलन करण्यात आले. यावेळी मा. नगरसेविका वर्षाताई तापकीर,राणीताई भोसले यांचेसह सामाजिक कार्यकर्ते रामदास भोसले, संतोष जाधव, अमोल चौधरी, राजेंद्र गोगावले, जितेंद्र कोंढरे मिलिंद पन्हाळकर,विजयाताई भोसले,ब्रम्हमुहुर्त योग ज्ञानपीठ केंद्राच्या अश्विनी पासलकर,नानी बेल्हेकर यांनी रक्तदान शिबीरास भेट देऊन धनकवडे यांना शुभेच्छा दिल्या.
या शिबीराचे आयोजन यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी श्री संयुक्त मित्र मंडळ,शिवतेज मित्र मंडळ,गुलमोहर मित्र मंडळ यांचेसह शनि मारुती प्रतिष्ठान व तुळजाभवानी ट्रस्ट यांचे कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.