
दैनिक चालु वार्ता उपसंपादक छत्रपती संभाजीनगर- मोहन आखाडे
छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या पूर्वसंध्येला किराडपुऱ्यातील राम मंदिरसमोर दंगल उसळली. या दंगलीच्या तपासासाठी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी १२ सदस्यीय एसआयटी स्थापन केली आहे. सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार हे मुख्य तपास अधिकारी असून किराडपुरा दंगल प्रकरणाचा सखोल तपास एसआयटी करणार आहे.
या दंगलीप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २८ जणांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांना ३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी ५० हून अधिक आरोपींची ओळख पटवली आहे. त्यांचा शोध सुरू आहे.
*मोठा पोलीस बंदोबस्त तैनात :*
चार दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून त्यातच आता आघाडीची भव्य सभा आणि दुसरीकडे भाजप आणि शिंदे गट शिवसेनेचा सावरकर मेळावा. त्यात डीआयजी, तीन पोलिस उपायुक्त, सहा सहायक पोलिस आयुक्त, सतरा पोलिस निरीक्षक, 46 पोलिस उपनिरीक्षक आणि हजाराहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
🎥 एवढेच नव्हे तर महाविकास आघाडीची बैठक होत असलेल्या सांस्कृतिक क्रीडा केंद्रावर 16 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिला.