
दैनिक चालू वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
बीड –तालुक्यातील उमापूरमार्गे एक हायवा अवैध वाळू घेऊन येत होता. यावेळी महसूलच्या पथकाने या हायवाला पाठलाग करून पकडले. चकलांबा गावाजवळ महसूलच्या पथकाने शनिवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. तब्बल २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महसूलचे पथक उमापूरसह विविध ठिकाणी गस्त घालत असताना उमापूरहून अवैध वाळू घेऊन येणारा एक हायवा या पथकाला दिसला. या वाहनाला पथकाने थांबविण्याचा प्रयत्न केला. तो थांबला नाही. त्याचा पाठलाग करून चकलांबा गावाजवळ हायवा पकडला. यावेळी हायवा अवैध वाळूने भरलेला होता. या कारवाईत तब्बल २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चकलांबा पोलिस ठाण्यात हा हायवा लावण्यात आला आहे. या कारवाईत नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, नामदेव खेडकर, मंडळ अधिकारी सानप, तलाठी ढाकणे, परमेश्वर काळे यांच्यासह अनेकांनी ही कारवाई केली. दोन दिवसांपूर्वी गेवराईहून बीडकडे अवैध वाळू उपसा घेऊन जाणारा एक हायवा पाडळसिंगीजवळ पकडला होता. यावेळी देखील तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.