
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी-शिवकुमार बिरादार
मुखेड:- वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य मराठवाडा विभागाच्या प्रसिद्धीप्रमुख पदी ह.भ. प संग्राम श्रीपतराव वडजे यांची वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष काकाजी शिंदे यांच्याकडून निवड करण्यात आली
संत साहित्याच्या प्रचार व प्रसाराची बांधिलकी असलेल्या वारकरी साहित्य परिषदेचे कार्य तितकेच प्रभावीपणे व्हावे ही परिषदेने अपेक्षा व्यक्त केली आहे.
या निवडीचे वारकरी संप्रदायाने अभिनंदन केले असून राजेश्वर महाराज बोमनाळी कर, वारकरी साहित्य परिषद जिल्हा अध्यक्ष, नांदेड त्र्यंबक पाटील केरूरकर , भागवत पाटीलतांदळी कर, ज्ञानोबा पाटील भालके, महाराज शिरशीकर, भास्कर पाटील भगनूरकर,
गणपत पाटील तांदळीकर, सर्व वारकऱ्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.