
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी -दीपक कटकोजवार
राष्ट्रीय स्तरावर पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून व्हाइस ऑफ मिडिया चीओळख आहे. याच संघटनेच्या डिजिटल विभागाचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी श्री.विजय सिध्दावार यांची नियुक्ती झाली आहे. या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे असुन प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड यांनी या नियुक्तीचे पत्र पाठविले आहे. विजय सिध्दावार हे स्थानिक जेष्ठ पत्रकार असुन गेल्या ३०वर्षापासुन पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत. महाविदर्भ, महासागर, नागपूर पत्रिका व ल़ोकसत्ता आदी वृत्तपत्राचे वार्ताहर म्हणून काम केले असून नामवंत वृत्तपत्रांमधुन त्यांचे लेख सुध्दा प्रसिद्ध झाले आहेत. साप्ताहिक पब्लिक पंचनामा वृत्तपत्र व पब्लिक पंचनामा या पोर्टल चे ते मुख्य संपादक आहे. पत्रकारीतेच्या क्षेत्रात विजय सिध्दावार यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. या नियुक्ती बद्दल श्री.सिध्दवार यांनी संघटनेच्या वरिष्ठांचे आभार व्यक्त करून आगामी काळात लवकरच चंद्रपूर जिल्हा डिजीटल मिडीयाच्या कार्यकारिणीचे गठण करुन जिल्ह्यातील पत्रकारांना शिबीराचे आयोजन करून प्रशिक्षित करण्याचा मानस व्यक्त केला असुन पत्रकारांच्या न्याय हक्क मागण्यांसाठी मेळावा सुध्दा घेण्याबाबत त्यांनी माहीती दिली आहे.