
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी भूम -नवनाथ यादव
भूम:- तालुक्यातील आष्टा – आष्टावाडी – शेखापूर येथील विविध विकास सोसायटीच्या चेअरमन पदी चंद्रकांत सर्जेराव काकडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल ग्रा.पं. सदस्य युवा नेते सुशेन (आणा) जाधव, आशिष गिलबिले, सतीश नलवडे यांनी सत्कार केला.
आष्टा- आष्टावाडी – शेखापूर चे १३ सोसायटी चे संचालक बिनविरोध असून यामध्ये चेअरमन चंद्रकांत काकडे व व्हॉइस चेअरमन तानाजी गिलबिले यांची निवड बिनविरोध करण्यात आली.
विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन चंद्रकांत काकडे हे सलग १३ वर्षापासून या पदावर एक हाती सत्तेवर असुन, यावेळी झालेल्या निवणुकीमध्ये सर्वानुमते निवड करण्यात आली.
याप्रसंगी त्यांच्या कुबेर नलवडे ,शामराव सुर्यवंशी,बापूराव सुर्यवंशी, माजी जिल्हा परीषद सदस्य प्रदीप काकडे,शिवाजी जाधव ,राम मोरे ,अमोल काकडे,गणेश गिलबिले,त्रिंबक घाडगे,सुनील गिलबिले
चंद्रकांत सूर्यवंशी,विक्रम शेळके,मलिकर्जून यादव
बाबासाहेब गिलबिले ,दत्ता गापट ,अंगद नलवडे,राजेश काकडे,अभिजीत काकडे,अच्युत काकडे,निवांत गिलबिले,हनुमंत शेलार,सूरज जाधव,संजय पारडे,अमर सुर्यवंशी,आकाश काकडे,रितेश काकडे
सूरज गिलबिले,बाब्रुवान माळी आदी आष्टा ग्रामस्थांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला.