
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- तालुक्यातील आष्टा – आष्टावाडी – शेखापूर येथील विविध विकास सोसायटीच्या चेअरमन पदी चंद्रकांत काकडे तर तानाजी गिलबिले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आष्टा- आष्टावाडी – शेखापूर चे १३ सोसायटी चे संचालक बिनविरोध असून यामध्ये चेअरमन व व्हॉइस चेअरमन यांची बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी संचालक मिठू गिलबिले,धनंजय घरत,वसंत गिलबिले, पांडुरंग काकडे, संभाजी गिलबिले,रमेश वाघमारे ,आदिक माळी,पंडित डीसले, साहेबराव हांडे,जुल्लेखा पठाण, सौ.मंगल जाधव आदी आष्टा ग्रामस्थांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला. यावेळी सरपंच सुनिल जाधव, ग्रा. पं. सदस्य तात्यासाहेब अष्टेकर,तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.