दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड- गोविंद पवार
बोरगांव येथील कै.नामदेव दसरू पाटील यांचा मृत्यू होऊन अंदाजे दहा ते बारा वर्ष झाले आहेत. त्यांच्या पश्चात त्यांना दोन मुले असून मोठे बापूसाहेब नामदेव पाटील व दुसरे केशव नामदेव पाटील अशी आहेत. त्यांना बोरगाव शिव शिवाराचे आत मध्ये शेतजमीन नाही. तसेच बापूसाहेब पाटील शेती तर केशव पाटील हे रेशीम उद्योग करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवितात. हे दोघेही भाऊ आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह स्वाभिमानाने चालवतात. व काळ्या मायची सेवा करतात कै. नामदेव दसरू पाटील व त्यांच्या मुलाविषयी लिहिण्याचे कारण कै. नामदेवराव पाटील ज्यावेळी मयत झाले त्यावेळी समाजाने त्यांना अग्नी देण्यासाठी लागेल एवढी जमीन देण्यासाठी विरोध केला व कै. नामदेव पाटील यांना बोरगाव शेत शिवारामध्ये म्हणजेच शिव रस्त्याच्या आत मध्ये जमीन नसल्यामुळे त्यांच्या प्रेताची अवहेलना झाली.
गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पॅनल प्रमुख श्री. पुंडलिकराव हारजी पाटील, सरपंच सौ. कांताबाई तुळशीराम हंकारे, उपसरपंच सौ. जयश्रीताई पुंडलिकराव पाटील यांनी व सर्व ग्रामपंचायत सन्माननीय सदस्यांनी शासनाकडून एक वर्गखोली बांधकाम मंजूर करून घेतली त्या वर्ग खोलीचे बांधकाम सुरु करणार तोच गावातील काही लोकांनी तक्रारी व अर्ज फाटे करून ज्या ठिकाणी गावातील “गोरगरीब, हिंदू-मुस्लीम, दलित, जमीनदार तसेच राजकारण करणाऱ्या लोकांची व शाळा होऊ नये म्हणून अर्ज फाटे करणाऱ्या लोकांची लहान मुले शिकणार त्या ठिकाणी राजकारण आणून वर्गखोली बांधकाम रोखले.
ग्रामपंचायत कार्यालयाचे मालकीची गावामध्ये एकही गुंठा जागा नाही, गावास गायरान नाही. तसेच शासनाचे नावावर गावात जागा नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी गावाच्या सभोवताली जमीनदारास एक वर्ग खोली बांधकाम होईल एवढी जागा देण्याची विनंती केली असता त्या जमीनदाराने एक इंच सुद्धा जागा देणार नाही असे सदस्याना सांगितले. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, बोरगाव शिवारामध्ये एकही गुंठा जमीन नसणारे केशव नामदेव पाटील यांना वर्गखोली बांधकामासाठी जिल्हा परिषद शाळे जवळची खुली जागा देण्याची विनंती केली असता केशव नामदेव पाटील यांनी कोणताही विचार न करता ” मी जिल्हा परिषद शाळेला वर्गखोली बांधकामासाठी दिलेल्या जागेवर इमारत होऊन त्या इमारतीमध्ये गावातील लहान थोरांची, दीनदुबळ्यांची, गोरगरिबांची, जमीनदारांची, राजकारण्यांची, दिनदलितांची, हिंदू व मुस्लिमांची अशा विविध जाती धर्मातील लोकांची मुले शिकणार असतील तर मी सदरची जागा जिल्हा परिषद वर्गखोली साठी रजिस्ट्री करून शाळेच्या नावावर दान देतो ” असे म्हणून त्या भाग्यवंत पुत्रांनी जिल्हा परिषद शाळा बोरगाव आ. च्या वर्गखोली साठी स्वतःची जागा रजिस्ट्री करून शाळेला दान दिली आहे. त्या भाग्यवंत पुत्राने शाळेला जागा दान देऊन आपल्या पित्याची कै. नामदेवराव पाटलांची आठवण करून दिली आहे. यानिमित्ताने कै. नामदेव पाटील आजही गावातील सर्व जाती धर्मातील त्या वर्गखोलीत बसून शिकणाऱ्या मुलांच्या रूपात “अजरामर” होणार आहेत. आशी प्रतिक्रिया गावातील जेष्ठ मंडळी कडुन येत आहे.