दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मंठा ता. ०३ मंठा येथील शिंदे गट शिवसेना तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांना संत तुकाराम महाराज समाज भूषण राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्र राज्य जाहीर कानसा वारणा फाउंडेशन तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारात तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांना हा पुरस्कार यावर्षी जाहीर झाला आहे.
शेतकरी कर्जमाफी मोर्चा, अवयदान शिबिर,रक्तदान शिबिर, गोरगरिबांना ब्लॅंकेट व अन्नधान्य वाटप, अपंग विद्यार्थ्यांना व्हील चेअर, व सायकल वाटप,विविध देवस्थान परिसरात सिमेंट खुडच्या वाटप, शेतकरी कर्जमाफीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा आधी विविध सामाजिक कामामुळे तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांना संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महाराष्ट्र राज्य २०२३ हा पुरस्कार कानसा वारणा फाउंडेशन राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पाटील व उपाध्यक्ष रामदास पाटील तर्फे जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार मुंबई येथे ५ एप्रिल ला देण्यात येणार आहे
या पुरस्काराबद्दल उदयसिंह बोराडे यांचे माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, माजी मंत्री बबनराव लोणीकर,भाजपा युवामोर्चा प्रदेशअध्यक्ष राहुल लोणीकर,संपर्कप्रमुख पंडित भुतेकर, युवासेना राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर,जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल, भाऊसाहेब घुगे,शिवसेना नेते प्रल्हादराव बोराडे,आदीने कौतुक करून शुभेच्छा दिल्या.