दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर.
वाघोली.ता.3
वाघोलीतील वाघेश्वर मंदिराशेजारी असणाऱ्या वाघेश्वर गार्डनमधील कामांसाठी २५ लाख रुपयांची तरतूद पुणे महानगरपालिकेच्या चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. वाघेश्वर गार्डनमध्ये अनेक महिन्यांपासून रखडलेली कामे तरतूद केलेल्या निधीतून होणार आहे.
वाघोलीतील नागरिकांसाठी एकमेव सार्वजनिक गार्डन असलेल्या वाघेश्वर गार्डन मध्ये ग्रामपंचायत काळात देखरेख व डागडुजी केली जात होती. मध्यंतरी कोरोना काळातही गार्डन बंद करण्यात आले होते. कोरोना आटोक्यात आल्यानंतर नागरिकांनी मागणी करून गार्डन खुले करण्यात आले. गार्डन खुले झाल्यानंतर लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत नागरिक गार्डन चा वापर करीत आहे. मध्यंतरी गार्डनच्या खेळण्याची दुरुस्ती करावी अशी मागणी देखील नागरिक करीत होते. महापालिकेने वाघेश्वर गार्डन मधील कामे करण्यासाठी स्वतंत्र २५ लाख रुपयांची निधीची तरतूद केली आहे.