
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती विभाग चंद्रपूर (ग्रामीण) घुग्घुस शहराच्या अध्यक्ष पदावर विक्रम गोगला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) काँग्रेस कमेटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रफुल खापर्डे यांनी पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाचे ध्येय धोरणे सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी विक्रम गोगला यांना नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती केली तसेच निवडीबद्दल अभिनंदन केले.
यावेळी चंद्रपूर काँग्रेस कमेटीचे (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, घुग्घुस काँग्रेसचे नेते जावेद सिद्दीकी, गणेश उईके, दादू वर्मा, कल्याण सोदारी, सचिन गोगला, सागर कलगूर व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.