
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे.
मंठा
स्वामी महाविद्यालय मंठा येथे सौ. मनिषा निखाले / गायकवाड यांना ता.२६ मार्च रोजी संभाजी नगर येथे अविष्कार सोशल एज्युकेशन फॉउंडेशन वतीने राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.जागतीक महिला दिनानिमित्ताने संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने कर्तुत्ववान महिलांचा गौरव करण्यात येतो.या वर्षाचा पुरस्कारा करिता प्राध्यापिका सौ मनिषा निखाते/गायकवाड यांना देण्यात आला संस्थेची अध्यक्ष संजय पवार, मराठवाडा सचिव रंजीत खंदारे प्रा.डॉ.संतोष भोसले, अतिरिक्त अधिकारी गव्हाणे, विद्या पटवारी यांच्या उपस्थिती मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थीती होते. राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार प्राप्त केले मंठा पंचक्रोशीतून सर्व स्तरातून सौ. मनीषा गायकवाड/ निखाते यांचे स्वागत करण्यात येत आहे