
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :-अंजनगाव सुर्जीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे अडत्या,व्यापाऱ्यांच्या अंतिम यादीमध्ये हेतू पुरस्परपणे घोळ झाल्याची स्पष्टपणे पुस्टी झाल्यावर,आपल्या मतदानाचे हक्काची मागणी करण्यास यादीत नावे नसणारे अनुज्ञाप्ती
धारक अडते,व्यापारी हाय कोर्टात दाद मागणार असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक,सचीव,कर्मचाऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या निवडणूक पूर्व मतदान याद्या करण्याच्या प्रक्रीयेत घोळ करुण हेतुपरस्परपणे नावे वगळल्याचा आरोप व्यापाऱ्यांचा असताना,रेग्युलर अनुज्ञाप्ती धारकांची त्यांची नावे ही दोन वर्षे पूर्ण झाल्याचे रेकॉर्ड पुरावे असताना सुद्धा हेतुपरस्परपणे अडत्याची नावे गायब केलीत
याबाबत निवडणुक अधीकारी,जिल्हा उपनिबंधक अमरावती यांचेकडे धाव घेतली,परंतु अंतीम याद्या प्रसीद्ध झाल्याकारणाने व नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रीया सुरु झाल्यामुळे संबंधित बाबतीतील अधिकार आमचेकडे नाही.आता हायकोर्टच यावर हस्तक्षेप करु शकते.हा निर्णय झाल्यावर,नावे गहाळ झालेल्या रेग्युलर अनुज्ञाप्ती धारक व्यापाऱ्यांनी हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला असुन,बाजारसमीतीच्या प्रशासक,सचिव व सबांधित कर्मचाऱ्यांकडून हेतू परस्परपणे,दुषित हेतूने गहाळ केल्याचा व मतदानाचा हक्क हीरावणाऱ्या कटकारस्थाना विरोधात दाद मागण्यास व्यापारी व त्यांचे सहकाऱ्यांनी हायकोर्ट नागपुर येथे प्रस्थान केले आहे.पुर्वग्रहदुषीत यादीमुळे या व्यापाऱ्यांना मतदानाच्या हक्का पासुन वंचित ठेवणाऱ्या प्रशासनाचे कृती विरोधात हायकोर्ट काय निर्णय देते याकडे तालुक्यासह सहकार क्षेत्रातील दिग्गजमंडळी लक्ष ठेउन आहेत.
—————————————-
आम्ही अंतीम यादीवर आक्षेप घेतला नाही,हे म्हणने जरी बरोबर असले तरी,आम्ही अहर्ता धारक व रेग्युलर अनुज्ञाप्ती धारक व्यापारी असतांना बाजार क्षेत्रातील आम्हा मोजक्या व्यक्तींची नावे जे मतदार यादीत पात्र असतांना ती हेतुपुरस्परपणे वगळली गेली आहेत,ही एक दोन नावे नसुन अनेक नावे आहेत,एवढी नावे सुटणे म्हणजे फार मोठा घोळ आहे.हा षडयंत्राचा भाग असु शकतो,ह्याबाबत आम्ही याचिका दाखल केली असून त्याची हायकोर्टात दाद मागणार असे मनोहर मुरकुटे,अनुज्ञाप्ती धारक व्यापारी ह्यांनी सांगितले.