
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार/सिरसी बु:- सिरसी बु ता. कंधार येथे मंजूर असलेली जल जीवन मिशन योजने अंतर्गत पाण्याची टाकी पुर्नवसन या ठिकाणी बांधण्यात येणार असल्याचे पाणी पुरवठा अभियंते, संबंधित गुत्तेदार,ग्रामपंचायत सिरसी बु चे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांनी उपोषणाच्या निवेदनाचा विचार करून पुर्नवसन या ठिकाणीच पाण्याच्या टाकीच्या जाग्यावर जाऊन स्थळ पाहणी केली व पाण्याच्या टाकीचे स्थलांतर प्रस्ताव आणि वाढीव ईस्टीमेंट करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयास मंजूरीसाठी पाठविण्यात आले आहेत. मंजूरी मिळाल्यानंतर लगेच पाण्याची टाकी बांधली जाईल असे पाणी पुरवठा अभियंते डिकळे साहेब, गुत्तेदार, सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच यांनी उपषणकर्ते कळविले आहे.त्यांची मागणी मान्य झाल्यामुळे त्यांच्या प्रर्यत्नाला यश आले आहे त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले आहे.