
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा) नजीकच्या कारंजा(घा) येथील भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा हर्षालताताई जयकुमार बेलखडे यांनी अंतर्गत नाराजीमुळे राजीनामा दिल्याचे विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले त्यात हर्षलताताई बेलखेडे यांनी शेतकऱ्याच्या ज्वलंत समस्या मांडताना पक्षाकडून होणारी अडचण विचारात घेत मला पदमुक्त करण्यात यावे असे आपल्या एक पाणी राजीनामा पत्रात म्हटले आहे गेल्या ३ वर्षापासून हर्षलताताई बेलखडे यांनी वर्धा जिल्हा भाजप युवा मोर्चा मध्ये सक्रिय काम केलेले आहे सोबतच शेतकऱ्याची दैनंदिन अवस्था पाहून कारंजा (घा) तहसील कार्यालयावर बेलखडे दांपत्याने स्वनेतृत्वावर शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढून जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले होते हे विशेष कारंजा(घा) येथील विश्राम गृहावर पत्रकार परिषद घेत त्यांनी राजीनामा दिला असल्याचे स्पष्ट केले आहे यावेळी त्यांनी सध्या मी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काम करत असून मला राजकीय पक्षात काम करण्यात रुची नाही यापुढे मी सदैव शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणार असल्याची माहिती दिली आहे गेल्या अनेक दिवसांपासून
हर्षलताताई बेलखडे व पती जयकुमार बेलखडे यांनी आर्वी विधानसभा क्षेत्रात सामाजिक कार्याचा वसा घेतला आहे त्यामुळे त्यांनी राजकीय देवून पक्ष सोडत असल्याचे सांगितले आहे