
दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक- ओंकार लव्हेकर
पंचायत समिती लोहा येथे आज विठ्ठल कुलकर्णी यांना वयोमानानुसार सेवानिवृत्तीचा निरोप देण्यात आला. त्याप्रसंगी गटविकास अधिकारी शैलेश वावळे म्हणाले, मी इतके दिवस नोकरी केली. पण इतका शांत आणि संयमी माणूस मी पाहिला नाही. पंचायत समितीमध्ये कुठलेही प्रकरण असो किवा उपोषण, कार्यक्रम असो की माळेगाव यात्रेतील नियोजन कुलकर्णी हे अग्रेसरच असायचे.विठ्ठल कुलकर्णी हे आरोग्य विभागात असल्यामुळे आरोग्य विभागातील कामे व इतर प्रशासनास मदत करणे तेही प्रामाणिकपणे निस्वार्थ मनापासून कार्य करत असत. अशा व्यक्तींची प्रशासनाला गरज आहे. असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन गटविकास अधिकारी वावळे यांनी केले.
यावेळी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गटविकास अधिकारी शैलेश वावळे, सत्कारमूर्ती विठ्ठल वसंतराव कुलकर्णी, सविता विठ्ठल कुलकर्णी, प्रमुख पाहुणे म्हणून श्री नरेंद्र गायकवाड माजी उपसभापती, रोहित पाटील आडगेकर माजी उपसभापती, गुजलवार सर, गजानन शिंदे अध्यक्ष ग्रामसेवक संघटना लोहा, , डी. आय. गायकवाड व एस. एच .मेहेत्रे विस्तार अधिकारी पंचायत समिती लोहा,राम चिवडे कल्याणकर ग्रामसेवक,सतीश चोरमले कक्ष अधिकारी पंचायत समिती लोहा, प्रियदर्शन वाघमारे, दिनेश तेलंग,चोडे,सुतार मॅडम, भताने सर आणि भताने मॅडम, विजय कुलकर्णी, अनंत कुलकर्णी,राहुल देशमुख, राघवेंद्र कुलकर्णी, संध्या कुलकर्णी , सौ स्नेहल राघवेंद्र कुलकर्णी, मोहिनी कुलकर्णी , मधुरा कुलकर्णी इंद्रायणी कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सत्काराला उत्तर देताना विठ्ठल कुलकर्णी हे थोडे भाऊक झाले होते. मी एवढे कार्य केवळ आपल्या सहकार्यामुळे करू शकलो व सेवानिवृत्त झालो तरी यापुढेही आपल्या सोबत जेव्हा जेव्हा काम पडेल तेव्हा तेव्हा सोबत असेल असे त्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी पत्नी सो.सविता विठ्ठल कुलकर्णी विशेष आभार व्यक्त केले.
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार धनंजय देशपांडे विस्तार अधिकारी पंचायत समिती लोहा यांनी उत्कृष्टरित्या सादर केले.