दैनिक चालु वार्ता उपसंपादक छत्रपती संभाजीनगर – मोहन आखाडे
सरस्वती कुंदे यांचा सत्कार
शिऊर : सेवानिवृत्तीबद्दल सरस्वती कुंदे यांचा संस्थेचे अध्यक्ष जे. के. जाधव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्था, छत्रपती संभाजीनगर संचलित संत बहिणाबाई कन्या प्रशाला, शिऊर (ता. वैजापूर) या प्रशालेत पर्यवेक्षिका म्हणून श्रीमती कुंदे या कार्यरत होत्या. सत्कारप्रसंगी डॉ.व्ही. के. सपकाळ, अंकुर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गोविंद गोंडपाटील, माजी सरपंच अशोक जाधव, संचालक धन्नालाल चुडिवाल, प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ बोडखे, मुख्याध्यापक उत्तम सानप, प्रा. वाकळे, हराळे, प्रा. कैलास जाधव, प्रा. शेखर देशमुख, ऋषीकेश सपकाळ आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन एस. एस. कुलकर्णी तर आभार सुभाष गायकवाड यांनी मानले.