
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार/पेठवडज :- मुखेड तालुक्यातील काही बड्डे नेते मंडळीं व पेठवडज येथील काही स्थानिक नेते मंडळींना हाताशी धरून पेठवडज तलावामधून
मुखेड तालुक्यातील पांडुर्णी, कापडवाडी, आडमाळवाडी
या गावासाठी
जल जीवन मिशन योजनेचे नाव सांगून कुठल्याही संबंधित कार्यालयाच्या परवानग्या न घेता अनाधिकृतपणे
पेठवडज धरणामध्ये विहिरीचे खोदकाम चालू केले होते.
ही बाब गावातील काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली
त्यांनी गावात माहिती दिली
त्यानंतर हरिश्चंद्र राजे व पांडुरंग कंधारे या दोन युवकांनी
ग्रामपंचायतला व सिंचन ऑफिस येथे जाऊन चौकशी केली असता
दोघांनींही आम्हाला काहीच माहित नाही .त्या विहिरीशी आमचा काही संबंध नाही
अशी उडवाउडवीची उत्तरे दिली
तेव्हा त्या दोघांनी गावांमध्ये फिरून व पेठवडज धरणाच्या लाभक्षेत्राखालील सिरसी खुर्द , सिरसी बुद्रुक, गोणार, येलूर ,मसलगा, नारनाळी, मादळी ,खंडगाव, या गावांमध्ये प्रत्यक्ष फिरून सर्व शेतकऱ्यांना भेटून विचारविनिमय जनजागरण केले
तसेच इकडे पेठवडजमध्ये
कैलास कडमपल्ले व धोंडीबा गड्डमवार
या दोन युवकांनी
ताबडतोब तलावामध्ये जाऊन अनाधिकृतपणे होत असलेले
खोदकाम त्वरित थांबवले
मग गावकऱ्यांनी
दिनांक ३/ ४/ २०२३रोजी ग्रामपंचायत येथे ग्रामसभेची मागणी करून यासाठी ग्रामसभा बोलावण्यासाठी अर्ज दिला
ग्रामपंचायतने लोक आग्रहास्तव
दिनांक ४/४/२०२३ रोजी ग्रामसभा घेण्यात आली.
पेठवडज धरणातलं पाणी धरणाच्या लाभक्षेत्राच्या व कंधार तालुक्याच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही.
असा ठराव
सर्व गावकऱ्यांच्या सहमतीने मंजूर करून घेतला.
हा ठराव ग्रामपंचायतच्या वतीने सर्व संबंधित कार्यालयाला पाठवला जाणार आहे.
म्हणतात ना
गाव करील ते राव काय करेल.