
दैनिक चालु वार्ता नांदेड – प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव .
गुरुकृपा हॉस्पिटल नांदेड मध्ये रुग्णालयात औषध विक्रेते काम करत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा खुर्चीवरच मृत्यू झाला. ही हृदय द्रावक घटना नांदेड शहरात घडली असून ती घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे. .गुरुकृपा हॉस्पिटल नांदेड मधील औषधी दुकान चालक पवन तापडिया वय ( वर्ष 42 ) यांचे सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी साडेआठ वाजता प्रवीण तापडिया यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले विशेष म्हणजे ती आपल्या औषधी दुकानात बसलेले होते संगणकावर काम करत असताना बसलेल्या ठिकाणीच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यातच त्यांचे निधन झाले. वरच्याच मजल्यावर असलेल्या आयसीयू विभागात सुद्धा त्यांना घेऊन जाण्याची संधी काळाने दिली नाही यातच त्यांचे निधन झाले ही घटना सर्व नांदेडकरांसाठी व तमाम महाराष्ट्रातील जनतेसाठी चटका लावणारी असून सर्व जनतेने आपापल्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी चर्चा समाजात होत आहे.