
दैनिक चालु वार्ता कौठा प्रतिनिधी -प्रभाकर पांडे
कौठा :- धानोरा (कौठा) येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अंखड हरिनाम सप्ताह व भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असुन यात दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४ते ६ काकडा भजन सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण दु १ ते ४ भागवत कथा सायंकाळी ६ ते ७ ज्ञहरिपाठ रात्री ९ ते ११ किर्तन पहाटे हरिनाम जागर अशा प्रकारे दैनंदिन धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन श्री चितनबंन महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे
दैनंदिन किर्तन दि ४ एप्रिल.ह.भ.प.वासुदेव महाराज कोलबीकर दि ५ एप्रिल हा.भ.प.दत्ता महाराज वळसगवाडीकर दि ६ एप्रिल रोजी काल्याचे किर्तन ह.भ.प परमेश्वर महाराज सोमसवाडीकर व गावकर्याच्या वतिने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी परिसरातील भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन समस्त गावकरी मंडळी धानोरा यांच्या वतिने करण्यात आले आहे