
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
बीड–बीड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीडमध्ये रविवारी फोडला. ही बाजार समिती गेल्या अनेक वर्षापासून जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात आहे. पण, यावेळी बीडच्या अण्णांचे अजूनही तयातयात असल्याने त्यांनी या निवडणुकीत गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांना सोबत घेतले आहे. याचे कारण म्हणजे या समितीत गेवराईचेही मतदार आहेत. सभेत दोन्ही अण्णांनी मागील तीन पिढ्यापासून असलेल्या पवार क्षीरसागर घराण्यातील राजकीय जीवनपट मतदारांसमोर मांडला. स्व. केशरकाकू यांच्या आशीर्वादाने स्व माधवराव पवार यांनी काम केले आहे. हे सर्वांना माहीत आहे, असेही आमदार पवार यांनी सांगितले. या दोन्ही अण्णांना या निवडणुकीत भाजपचे बळ मिळणार असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर, गेवराईचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्याशी लढत यावी लागणार आहे. हे मात्र नक्की. बीडचे भैय्या व गेवराईचे भैय्यासाहेबांना दोन्ही अण्णांनी कमी समजू नये, अशी कुजबुज कार्यकत्यांत होती.