
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी -बालाजी देशमुख
बीड/अंबाजोगाई : – बर्दापूर पासूून जवळच असलेल्या लिंबगाव ता . अंबाजोगाई येथे श्री ह .भ .प. दामोदर महाराज लिंबगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला अखंड हरीनाम सप्ताह ;भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे अवाहन माजी सरपंच धर्मराज धुमाळ पाटील लिंबगावकर यांनी केले आहे . मौजे लिंबगाव येथे प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी अखंड हरीनाम सप्ताह व भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा श्री.ज्ञानेश्वरी ग्रंथराज पारायण सोहळा आयोजित करण्यात आलेला असून वर्ष ५३ वे दिनांक ०६/०४/२०२३ ते १३/४/२०२३ रोजी अखंड हरीनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हनुमान मंदिर, लिंबगाव येथे आयोजीत करण्यात आला असून या कार्यक्रमा दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दैनंदिन कार्यक्रम :पहाटे काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन, कथा, हरीपाठ,किर्तन, हरीजागर. होणार असून.ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ श्री ह .भ .प. शिवाजी महाराज धुमाळ पाटील व श्री ह .भ .प.अंकुश महाराज धुमाळ [ आबा ] हे असून भागवत कथा प्रवक्ते भागवताचार्य ह .भ .प. उमाकांत महाराज पूरी घाटनांदूर यांची भागवत कथा होणार आहे . सिंध वादक तुकाराम महाराज जाधव सारोळा गायक यादव जाधव खरोळा तबला वादक अविनाश चव्हाण यशवंतवाडी हे असून या सप्ताह मध्ये नांमाकीत किर्तनकारांचे किर्तन आयोजीत करण्यात आले असून किर्तनकार दि .६ /४ / २३ रोजी ह. भ. प. श्री माऊली महाराज चिन्मयानंद स्वामी मठ संस्थान दर्जीबोरगाव दि .७ /४ / २३ ह. भ.प. श्री. पांडूरंग महाराज कोकाटे नांदगाव दि .८ /४ / २३ ह. भ. प. श्री.विनायक महाराज काचगुंडे राजेवाडी दि .९ / ४ / २३ ह . भ .प. श्री . व्यंकटेश कृष्णाशास्त्री महाराज दि .१० /४ /२३ ह .भ.प. श्री .कृष्णादास महाराज साताळकर दि .११ / ४ / २३ ह . भ .प. श्री .वनिताताई पाटील महाराज भिवंडी दि .१२ /४ / २३ ह .भ .प श्री अविनाश सुर्यवंशी महाराज ,बर्दापुरकर तसेच दि .१३ /४ / २३ रोजी दुपारी एक ते तिन वाजता ह. भ. प. अमोल महाराज शास्त्री राधाकृष्ण वारकरी शिक्षण संस्था बोरगाव काळे यांचे काल्याचे किर्तन होणार आहे व नंतर सार्वजनीक महाप्रसाद होणार आहे तरी लिंबगाव व पचक्रोशीतील नागरीकांनी व भावीक भक्तांनी कार्यक्रमाचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .