
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना -लाकडाचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याला लाच मागून ती स्वीकारतांना सापळ्याचा संशय आल्यामुळे लाचेची रक्कम सोडून आरोपीने धूम ठोकल्याची घटना अंबड वन विभागात घडली.
या प्रकरणातील तक्रारदार हा लाकडाचा व्यवसायिक आहे. त्याने दिनांक चार रोजी ट्रक क्रमांक एम एच 18 बी जी 86 86 मध्ये लाकडे भरून तो मालेगाव कडे पाठवत होता .अंबड शहराजवळील घनसांवगी टी पॉइंटवर आल्यानंतर रात्री वनविभागाचे वनरक्षक संदीप नाईकवाडे यांनी हा ट्रक थांबविला आणि ट्रक सोडविण्यासाठी आठ हजार रुपये तसेच यापुढे ट्रकवर कारवाई न करण्यासाठी पाच हजार रुपये असे 13हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली आणि ट्रक जवळच असलेल्या एका पेट्रोल पंपावर उभा केला. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने जालना येथील लाच लचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली या तक्रारीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी तक्रारीची शहानिशा केली. असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून काल दिनांक पाच रोजी सापळा लावण्यात आला. सापळ्या दरम्यान वनरक्षक संदीप नाईकवाडे यांच्या सांगण्यावरून पहारेकरी गणेश विठ्ठल तुपे हा तक्रारदाराकडून आठ हजार रुपयांची लाच स्वीकारत होता. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रारदाराने इशारा केला आणि हा इशारा पहारेकरी गणेश तुपे यांच्या लक्षात आला.त्यानंतर घेतलेली लाच तिथेच टाकून तुपे यांनी धूम ठोकली. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक सुदाम पाचोरकर, पोलीस निरीक्षक शेख गणेश शेळके, जावेद शेख, गणेश भुजाडे, ज्ञानदेव झुंबड ,आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.