
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा तालुक्यातील कोकरसा
येथील ग्रामदैवत कोकेश्वरी मातेचा यात्रोत्सव गुरुवार दि.6एप्रिल ते 22एप्रिल दरम्यान असून यात्रोत्सवाची तयारी कोकेश्वरी मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात येत आहे. यात्रोत्सवासाठी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई व स्वच्छता करण्यात आली आहे.
चैत्र शुद्ध पौर्णिमेला भरणाऱ्या या यात्रोत्सवात मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम पार पडतात . मंदिरावर दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात. यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून गुरुवार 6 रोजी याठिकाणी श्रीष्टी ता परतूर येथील पालखीचे आगमन कोकरसा देवी येथे होईल. पोत खेळणे (छबीना) कार्यक्रम दि. ०६,०७,०८ गुरुवार, शुक्रवार, शनिवार तिन दिवस रात्री ७ ते १० या वेळेत होईल. श्रीष्ठीच्या पालकीचे प्रस्तान: दि. ०९/४/२०२३ रविवार रोजी सायंकाळी ५ वा. होईल.
पखाल पुजन दि. ०९/४/२०२२ रविवार सकाळी ९ वा. प्रक्षाळपूजन . दि.13 रोजी त्र्यंबकदास महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम दुपारी 12:30महाप्रसाद होईल