
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
परतूर शहरात हनुमान जयंती निमित्त सकाळी ९ वाजता हनुमान मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली, या निवडणुकीमध्ये सकल हिंदू समाजातील मोठ्या प्रमाणावर तरुण सहभागी होते, श्री सावता काळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची सर्व टीम मिरवणूक काढण्यासाठी खुप मेहनत घेऊन या हनुमान जयंती मिरवणुकीमध्ये ढोल ताशा पथक भगवे झेंडे ढौलत होती, जय जय हनुमान जय जय हनुमान अशा जोरदार घोषणा मिरवणुकीने परतुर गाव धुम धुमून गेले, रामनवमी रामनवमी मिरवणुकीनंतर जे वातावरण निर्माण झाले ते वातावरण एक वेगळा संदेश देऊन जात आहे, ७० वर्षात स्वतंत्र्याच्या काळानंतर हिंदू समाज एकत्रित झालेला कधीही बघितला नव्हता, परंतु रामनवमी निमित्त सखल हिंदू समाजातील मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी सहभाग घेऊ लागल्यामुळे नवचैतन्य निर्माण झाले, हनुमान जयंती निमित्त परतुर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरवणुकीत उपस्थित राजकीय नेते मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके,भारतीय जनता पार्टीचे नेते गणेश पवार, कल्याण तात्या बागल, सोनू अग्रवाल, पोलीस निरीक्षक श्री कोठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता हनुमान जयंती शांततेत पार पडली…