
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी -दशरथ आंबेकर
किनवट-तालुक्यातील विविध गावांमध्ये आज दिनांक मार्च रोजी सकाळपासून हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाआहे.मौजे ईरेगाव येथे काल सायंकाळपासून मंदिरात भाविकांनी जय श्रीरामच्या घोषणा देत भाविक भक्तांनी भजने करुन हनुमान जन्मोत्सव साजरा केलाआहे.हनुमान मंदिराचे पुजारी वामन सटवाजी मिराशे,विठ्ठल कोसकेवाड यांच्या हस्ते अभिषेक व महापुजा करण्यात आली आहे.गावातील अन्नदाते वनरक्षक लक्ष्मण राजाराम मेटकर इरेगाव यांनी महाप्रसादाचे आयोजन करण्यातआले होते.लगेच दुपारी बारा वाजता पासुन महाप्रसादाला सुरुवात झाली होती.गावातील अनेक नागरिकांनी प्रसाद ग्रहण केलाआहे.यासह ईस्लापुर,शिवणी,अप्पारापेठ, जलधारा,बोधडी,गोकुंदा,मांडवी, किनवट,सारखणीआदी भागातील गावांमध्ये हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व धार्मिक कार्यक्रम आयोजित करुन साजरा करण्यात आला होता.तालुक्यात सगळीकडे भगवेमय वातावरण निर्माण झाले होते.