
दैनिक चालु वार्ता आष्टी प्रतिनिधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा): जिल्ह्यातील आर्वी विधानसभेत निवडणूक जवळ येत असल्याचे अनेक लक्षणे विधानसभा क्षेत्रात फेरफटका मारल्यावर पाहावयास मिळते गल्ली बोळातील पोस्टरबाजी, कार्यकर्त्यांच्या फौजा,मंदिर,दर्गा व बुध्द विहारातील भेटी,देणग्या आश्वासनाची खैरात,मैदानी खेळाच्या स्पर्धा अश्या विविध माध्यमातून मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुक उमेदवाराकडून चाललेला खटाटोप अंतर्मुख करणारा आहे यासाठी गावोगावी जयंती,पुण्यतिथ्या मुर्त्या,देवळे असल्या धार्मिक स्थळी आवर्जून उपस्थिती लावून भक्तगणांना आकर्षित कार्यासाठी वस्तू स्वरूपातील देणग्या असे विविध प्रयोग इच्छुक उमेदवार आपल्या लाभार्थी कार्यकर्त्या करवी करीत आहे. दादा,भाऊ विकासगंगा तुमच्या पर्यंत कशी पोहचवू शकते?यासाठी लाभार्थी कार्यकर्ते आपले कार्य चोखपणे चौकाचौकात भाऊ आणि दादांच्या शाब्दिक प्रसिद्धीसाठी सज्ज झाले आहेत कुठलाही वैचारिक पाया नसलेली पण पोटभरू मूल्ये जोपासणारी लढाई आपल्या येणाऱ्या पिढ्यासाठी धोकादायक असल्याचे भान नसलेली बिनकामाची फौज आता भाऊ आणि दादासाठी सैनिक झाल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे. दादांचे व भाऊचे मुंबई,दिल्लीतील वजन खेड्यापाड्यात चर्चिले जावू लागलेत सर्वसामान्यांचा अनोळखी असलेला दादा,भाऊ आता नेता होऊ लागला भूमिपुत्र होऊ लागला?गरिबांचा मसिहा होऊ लागला आहे. सर्वसामान्य नागरिकांना नवखे उमेदवार इतरांच्या तुलनेत श्रेष्ठ? आणि वरिष्ठ आहेत याच्या चर्चा गावोगावच्या रिकामटेकड्या ठिकाणावर झडत आहे आतापावेतो कोणत्याही सामाजिक, राजकीय व धार्मिक कार्यात न दिसणारा अनोळखी दादा,भाऊ आता निवडणूकीचा बेत आखण्यासाठी सामाजिक कार्याचा बुरखा घालून निवडून जिंकण्यासाठी खटाटोप करीत असल्याची सत्य कुजबुज नागरिकात ऐकावयास मिळत आहे एवढे मात्र सत्य.