
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- हनुमान जन्मोसवाच्या पर्वावर जिल्हा परिषद अमरावती कार्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर जिल्हा परिषद कर्मचारी युनियन व जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटना यांच्याद्वारे भर उन्हात कार्यालयांत येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांना थंड पाणी मिळावं याकरिता मागील २०११ पासून पाणपोईचा उपक्रम सुरू आहे.या पाणपोईचे उद्घाटन ६ एप्रिल २०२३ रोजी ११ वाजता मा.श्री.संतोष जोशी अति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमावेळी श्री.तुकारामजी टेकाळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य व श्री.चंद्रशेखर खंडारे मुख्या लेखा तथा वित्त अधिकारी श्री.गिरीश धायगुडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत व श्री.दिनेश गायकवाड कार्यकारी अभियंता बांधकाम व श्री.सुनील जाधव जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री.डॉ.पुरुषोत्तम सोळंके जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना पंकज गुल्हाने अध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी युनियन यांनी केली.विष्णुपंत भुजाडे,पंकज गुल्हाने,श्रीकांत मेश्राम,दिनेश राऊत,ओमेंद्र देशमुख,योगेश मालवीय,सुजित गावंडे,दिपाली पडोळे,रजनी म्हस्के,गोत्री लाचूरे,सुशीला तानोडकर,विजय कविटकर,विजय कोठाळे,समक्ष चांदुरे,प्रतिक काळे,राजू गाडे,ईश्वर राठोड,प्रफुल कांडलकर,सुभाष जाधव,संजय नागरे,संजय भगत,विजय उपरिकर,आदित्य तायडे,भूषण मेहरे,परमेश्वर राठोड,गजानन इंगळे,श्रावण अंभोरे,राजेश ठाकरे,रोशनी पाचघरे,मिना इंगळे,शिल्पा ठाकरे,शशिकला वानखडे,संगिता पटोरकर,विजय कविटकर,शितल विटीवाले,किरण खांडेकर,विजया गवळी,मनिषा अंधारे,जया दाभाडे,गायत्री लाचुरे,सारीका राऊत,रजनी मस्के राजेश खांडेकर व मंगेश मानकर व विशाल विघे,शेख इम्रान,अमर ठाकरे,शेषराव कापसे,संजय लवाडे,श्रीकांत सदाफडे,संजय खडसे व राजू रोघे सदरहू संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते.