दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :- जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न व्हावा करिता जुना बस स्टॉप येथील भगवे झेंडे प्रशासनाला मिळालेल्या तक्रारीनुसार काढण्यात आले.परंतु झेंडे काढत असताना शुभेच्छा बॅनर तसेच कंपनीच्या जाहिरातीची बॅनर अनेक तक्रारी करूनही काढल्या जात नाही.कारण त्यापासून न.प.कार्यालयाला महसूल प्राप्त होत नसला तरी न.प.प्रशासक व संबंधित कर्मचारी यांना महिन्याकाठी लाखो रुपयांचा अवैध्य महसूल प्राप्त होतो.असे होत असताना शहर विद्रूप दिसो अथवा अपघाताचे प्रमाण वाढो.त्या संबंधित भ्रष्टाचारी कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाला त्याचे काय? तसेच अंजनगाव जुना बस स्टॉप वरील नाल्यामुळे पसरलेली घाण आणि त्यामुळे पसरलेली दुर्गंधी त्यामुळे प्रवाशांना आणि तेथे व्यवसाय करीत असणाऱ्यांच्या (फळ फ्रूट हॉटेल इत्यादी) आरोग्यास जीवघेणी ठरत आहे. भ्रष्टाचाराच्या गटारात तुडुंब बुडलेल्या प्रशासकाला याचे काही देणे-घेणे नाही.कारण हा प्रशासक भ्रष्टाचार मैला खाण्यातच धन्य मानत आहे.याला जर लगाम घातल्या गेली नाही तर अंजनगाव सुर्जीचे गावठाण झाल्याशिवाय राहणार नाही.सध्या अंजनगाव सुर्जी मध्ये चालू असलेली निकृष्ट दर्जाची कामे आणि त्या कामांवर वरदहस्त ठेवणाऱ्या प्रशासक आणि नगर अभियंत्याला जनतेच्या पैशाचा होणारा दुरुपयोग दिसत नाही.अंजनगाव सुर्जी मधील काही विशिष्ट ठेकेदार काम केले करत असून एका ठेकेदाराला किती काम द्यावे याबाबतही कोणतेही निकष ठेवण्यात आले नाही.शहरात करोडो रुपयाचे रोड बांधकाम सुरू असताना सुद्धा अंजनगाव सुर्जी शासकीय रुग्णालयाच्या समोरील रोडची अत्यंत दुरावस्था आहे ही शोकांतिकाचं.तसेच जुना बस स्टॉप येथे न.प.प्रशासनाद्वारे बांधण्यात आलेल्या लाखो रुपयांचे स्वच्छतागृह घाणीने माखलेले असून बंद अवस्थेत पडलेले आहे.यामुळे येथे उतरणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.