
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर शहरात व तेलंगणा राज्यातील मिर्झापूर (हनुमानपूर) येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात मोठ्या भक्ती भावाने हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती.
चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो ,यंदाही दि. सहा एप्रिल रोजी बाजारपेठेतील हनुमान मंदिरात गुरुवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास सायलू उल्लेवार यांच्या हस्ते हनुमानाची आरती करून … अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान……!
एक मुखाने बोला.. बोला …जय… जय हनुमान…..
व जय श्री रामाचा गजर गात ..देगलूर ते श्री हनुमानपूर (मिर्झापूर ) पदयात्रा काढण्यात आली. दरम्यानच्या काळात शहरातील होटल बेस हनुमान सेवा मंडळ, मुख्य बाजारपेठेतील हनुमान सेवा मंडळ मंदिर, लाईन गल्लीतील साळवण हनुमान मंदिर, मोंढा परिसरातील रोकडया हनुमान मंदिर या व अन्य ठिकाणच्या मंदिराच्या गाभाऱ्यात फुलाची आकर्षक सजावट, मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. उपरोक्त हनुमान मंदिर परिसरात जा त्या ट्रस्टच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला. या महाप्रसादाचा अनेक भक्तांनी आस्वाद घेतला आहे.
तसेच विविध संघटना व भाजपा कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी अल्प उपहार व पाणपोईची व्यवस्था केली होती.
हनुमान जन्मोत्साच्या पार्श्वभूमीवर हिंदू बांधवाची तहान भागविण्यासाठी देगाव नाका येथील मुस्लिम बांधव शेख महेबूब साब टालवाले व त्यांचे नातू चहावाले महंमद शेख यांनी थंड पाणपोईची व्यवस्था केली . भर उन्हात हनुमानाचे दर्शन घेऊन येणाऱ्याला व जाणाऱ्याला या थंड पाण्याचा आस्वाद घेतल्यामुळे बराच दिलासा मिळाला असल्याची प्रतिक्रिया अनेकाने व्यक्त केली आहे