
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
बीड/आष्टी –जरी तलाठी संख्या कमी असली तरी प्रत्येक तलाठी यांनी प्रत्येक सजावर किमान एक दिवस तरी थांबावे व गोरगरीबांचे कामे करावीत जे कामात हालगर्जीपणा करतील त्यांची गय केली जाणार नाही असा इशारा जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी दिला आहे.
बीड जिल्ह्याच्या नवनिर्वाचित जिल्हाधिकारी दिपा मुधोळ ह्या आष्टी तालुका दौरावर आल्या होत्या. त्यावेळी आष्टी येथील शासकीय विश्रामगृह येथे दुपारी चार वाजता आले असता माजी आ. साहेबराव दरेकर यांनी आष्टी तालुक्यातील विविध कामांवर चर्चा करत तलाठी सज्जावर थांबत नसल्याचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्या बोलत होत्या. पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाल्या, आष्टी तालुक्यात ६१ तलाठी सज्जे असून, सध्या ३० तलाठी आहेत. प्रत्येक तलाठ्यांना दोन तीन सज्जाचे काम आहे. परंतु प्रत्येक तलाठ्यांनी आठवड्यातून एक दिवस सज्जावर जाणे बंधनकारक आहे. जर तुम्ही फिल्डवर गेले नाहीत तर तुम्हाला तिथली माहिती कशी कळणार मोबाईल वरची माहिती न पाठविता ग्राऊंडलेवल एकदा तरी जावे जर ह्या कामात कुचराई केली तर मंडळअधिकारी व तलाठी यांची गय केली जाणार नाही असा इशाराही जिल्हाधिकारी यांनी दिला.यावेळी उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, मंडळअधिकारी शरद शिंदे, पांडूरंग माढेकर, सोनाली कदम, भगीरथ धारक यांच्यासह आदि उपस्थित होते.