
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
शहरात विविध कार्यक्रम राबवून भगवान महावीर जयंती मंगळवार (ता.४) रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
शहरातील कथले चौक येथील पार्श्वनाथ भगवान जैन मंदिर येथे समाजातील महिलांनी रांगोळी स्पर्धा, रंगरंगोटी, वक्तृत्व स्पर्धा, संगीत खुर्ची, वेशभूषा पाककला आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी आठ वाजता भगवान महावीर चा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांच्या मदतीने कसलेही ध्वनी प्रदुषण झाले नाही याची दक्षता घेत आयोजन केले होते. धाराशिव येथील सकल जैन समाजाचे ढोल पथक विशेष आकर्षण ठरले. मिरवणूक कथले चौक, विठ्ठल मंदिर, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अहिल्याबाई होळकर चौक, सावरकर चौक ते परत महावीर मंदिर अशा मार्गे मिरवणुक मार्गस्थ झाली. त्यानंतर भगवान महावीर यांचा जन्मउत्सव प्रसंगी पाळणा कार्यक्रम घेण्यात आले.
या मिरवणुकीमध्ये लहान थोरांपासून महिला भगिनी, समाजबांधव मोठ्या संख्येने सामील झाले होते. भगवान महावीर जयंती यशस्वी होण्यासाठी दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष हर्षद अंबुरे श्रावक संघ चे अध्यक्ष भिकचंद लोढा, संजय देवडा, महावीर बलाई, प्रकाश बलदोटा, आनंद बलाई, नितीन साखरे, महावीर एखंडे, अमोल बाभळे, शुभम संगवे, सचिन झांबरे, अनिल नाकिल, निशिकांत संगवे, मयूर रूणवाल,पिंटू खिंवसरा,
श्रीअंश पांगळ, अमोल कंगळे, सुनील नाकील,किरण झांबरे,दिपक मांडवकर, रमेश साखरे, रोहन पारख, विकी लोढा, प्रकाश मांडवकर,मिथून साखरे, प्रदीप संगवे, दर्शन एखंडे,विनायक रामढवे, सुमित बलदोटा, आनंद बलाई, यश सुराणा, किर्ती अंबुरे, पद्मा रामढवे, अंजली फडकुले, आशा बाभळे, सुचिता मांडवकर, साधना मांडवकर, माजी नगरसेविका पारख भाभी आदींसह समजातील नागरिक उपस्थित होते.