
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
ग्रामीण व शहरी भागातील महिलांना आर्थिक सक्षमिकरणासाठी भाग्यवंती अर्बन बँकेच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्मिती व महिला बचत गटाच्या आर्थिक उन्नतीसाठी सहकार्य होणार आहे .प्राचार्य बगडे व शोभाताई बगडे या दाम्पत्याने महिलांच्या हितासाठी ही बँक सुरू केली त्याचे मोठे पाठबळ मिळणार आहे त्यासाठी कोणतीही मदती साठी आपण बगडे कुटुंबियांच्या पाठीशी आहोत असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिताताई देवरे चिखलीकरा यांनी केले
लोहा शहरात माजी नगरसेवक शोभाताई बगडे यांच्या पुढाकाराने पुण्यवंती अर्बन निधी बँक सुरू करण्यात आली या बँकेच्या उदघाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे-चिखलीकर तर उदघाटक म्हणून शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किशनराव बेंडकुळे होते व्यासपीठावर जिल्हा बँकेचे संचालक प्रवीण पाटील चिखलीकर स्वामींनी ऍग्रो कंपनीच्या संस्थापिका अनिता माळगे (सोलापूर) , बहिनजी , माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार,उपनगराध्यक्ष दता वाले, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम , माजी उपनगराध्यक्ष रामराव सूर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल,गटनेता करीम शेख नगरसेवक भास्कर पाटील, नगरसेविका कल्पनाताई चव्हाण ,प्राचार्य गोविंदराव बगडे, बँकेच्या मुख्य प्रवर्तक शोभाताई बगडे, डॉ सौ घंटे, सविता सातेगावे, लक्ष्मीकांत बिडवई,, शर्वरी जाधव डॉ अश्विन जाधव , प्रा अजिंक्य बगडे यासह मान्यवर उपस्थित होते
जलचळवलीच्या प्रनेत्या प्रणिताताई देवरे चिखलीकर म्हणाल्या की, भाग्यवंती च्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागातील महिला बचत गट व महिला सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे.प्राचार्य बगडे व बँकेच्या अध्यक्षा शोभाताई बगडे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांनी उभे केलेल्या भाग्यवंती च्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक पाठबळ निर्माण होईल आम्ही सदैव सोबत आहोत असे प्राणिताताई यांनी आश्वासित केले.
देशाचे पंतप्रधान मोदी यांनी विशेष नोंद घेतलेल्या स्वामींनी ऍग्रो कंपनी सोलापूर च्या अध्यक्षा अनिता मालगे यांनी आपली यशोगाथा सांगितली पंतप्रधान मोदी यांनी कडधान्य व डाळ उत्पादनाची कशी नोंद घेतली इथं पासून ते देशाच्या वेगवेगळ्या भागात त्याच्या महिला बचत गटाने कसे उल्लेखनीय कामे केले ती प्रेरणादायी यशो गाथा त्यांनी महिलांना सांगितली व भाग्यवंती साठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासित केले.यावेळी प्रवीण पाटील चिखलीकर, उदघाटक किशनराव बेडकुळे , यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक भाग्यवंती च्या मुख्य प्रवर्तक शोभाताई बगडे यांनी बँकेच्या उभारणी मागची भूमिका सांगितली.संचलन विक्रम कदम यांनी तर आभार सविता सातेगावे यांनी मानले