दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी-
तालुक्यातील मौजे हंगरगा प.कं.येथील ग्रा.पं. कार्यालय अंतर्गत विकास कामासाठी आलेल्या शासकिय निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे व त्या प्रकरणात तत्कालीन गटविकास अधिकारी सी.एल.रामोड व इतर अधिकारी हे चौकशी समितीच्या अहवालात दोषी ठरविले असताना त्यांच्यावर शासन नियमाप्रमाणे कार्यवाही होण्याचे प्रस्तावित असूनही पुन्हा त्यांचीच पंचायत समिती मुखेड येथे गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती करणे हे संयुक्तिक नसून त्यांची ही नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दि.६ एप्रिल २०२३ रोजी तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संतोष बनसोडे, मनधरणी शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष हरिदास दिंडे, वाहतूक सेना तालुकाध्यक्ष ओम पाटील हगंरगेकर, हगंरगा ग्रामपंचायत कार्यालयाचे उपसरपंच प्रतिनिधी प्रदीप पताळे, ग्रा.पं.सदस्य शाम गायकवाड, मनसे तालुका उपाध्यक्ष रमेश गायकवाड यांच्यासह आदींची उपस्थिती होती.