
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर: गुढीपाडवा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शासनाने राज्यातील जनतेला १०० रुपयांमध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्याची घोषणा केली;
१०० रुपयांमध्ये १ किलो रवा, १ किलो गोडतेल, १ किलो साखर, 1 लिटर पामतेल एवढी सामग्री ‘आनंदाचा शिधा’ या योजनेच्या माध्यमातून शिधापत्रिका धारकांना वाटप केली. जानार आहे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून देगलूर तालुक्यातील अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी, व शेतकरी योजनेतील ३५ हजार २३३ शिधापत्रिकाधारक
लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा, वाटप करण्यास सुरुवात झाली आहे… त्याचा शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन माननीय श्री. अभिजीत राऊत जिल्हाधिकारी नांदेड माननीय श्री. संदीप कुलकर्णी जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूर तालुक्याचे तहसिलदार श्री. राजाभाऊ कदम व नायब तहसिलदार श्री. बालाजी मिट्टेवाड यांनी केले आहे… यासाठी श्री. उमाकांत गोने गोदामपाल तसेच पुरवठा महसूल सहा. चंद्रकांत धर्मेकर विरेश मठपती, ऋषीकेष दयाडे यांनी आनंदाचा शिधा विहित मुदतीत रास्त भाव दुकानात पोहचावे यासाठी परिश्रम घेतले आहे…