
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी माकणी
गणेश विठ्ठलराव मुसांडे
माकणी: बी.एस.एस.महाविद्यालय माकणी तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद येथे 26 नोव्हेंबर 2021 रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी , विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ . संजय बिरादार होते तर या कार्यक्रमास डॉ. काकासाहेब सुरवसे यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले .भारताचे संविधान हे भारतीय लोकशाहीचा मुख्य आधारस्तंभ आहे असे भाषणातून वक्त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले . संविधानाचे पावित्र्य प्रत्येक विद्यार्थ्यांनी जोपासली पाहिजे असे अध्यक्षीय समारोपात डॉ संजय बिरादार यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. श्रीकृष्ण मुंडे यांनी तर सूत्रसंचालन डॉ अनिल गाडेकर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. सतीश गावित यांनी केले अशा रीतीने संविधान दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.